राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग 5 प्रमाणे म्हणजे 50 लाखांपर्यंत कामे देण्यात यावे या मागणीसाठी मी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करीत होतो. अखेर या मागणीला यश आले व 25 ऑगस्ट 2014 रोजी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय निर्गमित केला. शासनाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र इंजिनिअर्स आसोशिएशनच्या शिष्टमंडळासह तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.