राज्याच्या विधी, न्याय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या माजी न्यायमूर्ती मा.बी.एन.देशमुख यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केल्याबद्दल 28 ऑगस्ट 2016 रोजी त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते औरंगाबाद येथे हा गौरव समारंभ पार पडला.