राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती. जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदांकरिता होणारी परीक्षा 25 व 26 नोव्हेंबर 2019 रोजी तर बृहन्मुंबई महानगर-पालिकेच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदांकरिता घेण्यात येणारी परीक्षा 25 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात येणार होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी अर्ज करणार्या उमेदवारांना कुठली तरी एकच परीक्षा देता येणार असल्यामुळे सदरील परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी मी 17 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यपाल मा.भगतसिंहजी कोश्यारी, राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली. सदरील परीक्षांच्या तारखा एकच आल्यामुळे राज्यभरातील अनेक परीक्षार्थीं या संधीस मुकणार होते. बहुतेक उमेदवारांनी या दोन्हीही परीक्षांसाठी अर्ज केलेले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाच्यावतीने होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी आग्रही मागणी मी लाऊन धरली. अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 नोव्हेंबर रोजी पत्रकाव्दारे कनिष्ठ अभियंता पदांची 25 व 26 नोव्हेंबर 2019 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हजारो भावी इंजिनियर्सना यामुळे दिलासा मिळाला व त्यांना दोन्ही परीक्षा देता आल्या.