राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी मार्च 2020 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात उत्कृष्टता केंद्र (सेंटर फॉर एक्सलन्स) स्थापन करण्याची घोषणा करून यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यामुळे विविध विषयासंबंधीच्या अत्याधुनिक व उत्कृष्ट सोई-सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात मी अनेक वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो.