यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा!’ या अभियानांतर्गत आदरणीय खा.सुप्रियाताई सुळे यांनी 11 ऑक्टोबर 2017 रोजी देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड, हुंडा विरोधी अभियान इत्यादी मागील अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्या, युवतींना होणारी छेडछाड व अत्याचार, हुंडाबळी, शैक्षणिकप्रश्‍न, युवक-युवतींची आत्महत्या या घटनांनी उच्चांक गाठलेला आहे. या विरोधात युवक-युवतींच्या मनातील भावना खा.सुप्रियाताईंनी जाणून घेतल्या. या वेळी माझ्यासह तत्कालीन आ.भाऊसाहेब पा.चिकटगावकर, आ.विक्रम काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.