मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने जुलै 2015 मध्ये मुंबई येथे पावसाळी अधिवेशनानिमित्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन भेट आयोजित करण्यात आली होती. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अर्थात आमदार सभागृहात कसे काम करतात?, कोणत्या पध्दतीने सभागृहाचे कामकाज चालते?, कशा पध्दतीने अधिवेशनकाळातील प्रश्‍नोत्तराचे तास घेतले जातात? हे विद्यार्थ्यांना समजावे, व त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेे, संसदीय कार्यप्रणालीचा प्रचार व्हावा, त्यांना सभागृहाचे कामकाज पाहता यावे हा यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे सभापती मा.रामराजे नाईक निंबाळकर, आदरणीय अजितदादा पवार, तत्कालीन विरोधी पक्षनेते मा.धनंजयजी मुंडे, तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.विनोदजी तावडे आदींसोबत विद्यार्थ्यांनी संवाद साधला, प्रश्‍नोत्तरे झाली.