महिलांसाठी संधी

पुरूषाच्या खांद्याला खांदा लावूनच आज महिला सामर्थ्यानिशी पुढे आलेली आहे. तिच्या स्त्री म्हणून जरूर काही समस्या आहेत, त्या सोडल्या तर प्रत्येक स्त्रीला तिच्या मनासारखा रोजगार वा स्वयंरोजगार करण्याचे स्वातंत्र्य आणि त्याबरोबर सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यासाठी शासन व समाजस्तरावर अनेक योजना व उपक्रम सातत्याने राबविले जातात.

ज्या महिलांना आपली क्षमता लक्षात घेऊन आयुष्यात स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे, त्यांच्यासमोर केवळ शाब्दिक बुडबुडे फोडण्याचे दिवस आता संपले आहेत. किंबहुना महिलावर्गाला आता राजसत्तेतच वाटा मिळालेला आहे. महाराष्ट्रात पंचायत राज आहे, तिथे 50 टक्के महिला आरक्षण दिले गेलेले आहे. आगामी काळात आपल्यासाठी कोणते धोरण ठरवायचे हा अधिकार घटनेनेच आता महिलांना दिलेला आहे. आपले घर तितक्याच नेटाने सांभाळणाऱ्या स्त्रियांनी आता खऱ्या अर्थाने उंबरठा ओलांडला आहे. आपल्या जीवनाची घडी बसविण्यास त्या स्वयंसिद्ध आहेत, हेच सिद्ध होत आहे.

महाराष्ट्रात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत तथा स्वयंसहाय्यता गटांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. प्रत्यक्ष उद्योग व व्यवहारात महिला कुठेही कमी पडत नाहीत, हेच या महिला गटांनी दाखवून दिले आहे. राज्यातील महिला सबला व्हाव्यात, यासाठी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अर्थकारण समजावून देण्याचे काम खासदार सुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व अन्य संस्थांच्या माध्यमातून सातत्याने करीत आहेत. यासंबंधी अधिक माहितीसाठी तसेच महिलांना उद्योजकीय साहाय्य करणाऱ्या उपक्रमांच्या माहितीसाठी काही संकेत स्थळे व इतर महत्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत.

महिलांसाठी विविध कोर्सेस

राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येथे मा. आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने श्रमिक विद्यापीठाच्या सलग्नतेने महिलांसाठी विविध स्वयंरोजगाराभिमुख कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत.