महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सप्टेंबर 2013 मध्ये सहायक अभियंता पदासाठी परीक्षा घेतली होती. मार्च 2014 मध्ये एमपीएससीने पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली होती, मात्र नऊ महिने होऊनही उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या. पात्र उमेदवारांनी यासंदर्भात माझी भेट घेऊन सदरील प्रश्न निदर्शनास आणून दिला तेंव्हा विधान परिषदेत मी हा प्रश्न उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. परिणामी तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्र्यांनी सभागृहात जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदासाठी पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे सांगितले व जलसंपदा विभागाने 24 डिसेंबर 2014 रोजी पात्र उमेदवारांना नियुक्त्या दिल्या.