महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे असून सदरील कार्यालय पुणे येथे स्थलांतर करण्याविषयी शासनस्तरावर प्रयत्न केले जात होते. ही बाब लक्षात येताच सदरील कार्यालयाच्या स्थलांतर प्रक्रियेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी मी 25 मे 2018 रोजी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे केली. अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव यांनी यासंदर्भात मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य हे कार्यालय प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वाल्मी औरंगाबाद येथेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला. व निर्माण झालेला पेच सोडवता आला.