मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कानडगाव जि.औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या तरूणाने आपले बलिदान दिले. 26 जुलै 2018 रोजी मी कानडगाव येथे शिंदे कुटुंबिंयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे यांना शैक्षणिक पात्रतेनुसार आमच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत कायम स्वरूपी लिपीक पदाची नोकरी दिली. अविनाश शिंदे हे ऑगस्ट 2018 पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील संस्थेच्या रघुनाथनगर, ता.गंगापूर येथे लिपीक म्हणून रूजू झाले आहेत.