मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 16 मे 2016 रोजी औरंगाबादेत देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा दुष्काळ परिषद घेण्यात आली. या परिषदेत आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या 141 कुटुंबियांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे बियाणे व पेरणीसाठी प्रत्येकी पंधरा हजारांची मदत करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांसह पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.