भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय शरद पवार साहेबांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात 12 डिसेंबर 2015 रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात मराठवाड्यातील 6500 हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेत विक्रमी रक्तदान केले.
स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावपळ करताना दिसतो. लोकांना आपल्या प्रकृतीकडेही लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांना आज सामोरे जावे लागत आहे. या रोगांवर उपचार करण्यासाठी लागणारा लाखो रूपयांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य समस्येमुळे होणारी परवड टाळता यावी म्हणून मी माझे वडील कै.भानुदासराव चव्हाण यांच्या नावाने […]