प्रभावसंग्रह

थोडक्यात यशवंतराव चव्हाण

१९१३: १२ मार्च सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी जन्म.

१९१८: वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगने निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण व नंतर कर्हाेड येथे शिक्षणासाठी दाखल.

१९२७: कर्हारडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कर्हावडच्या टिळकहायस्कूलमध्ये प्रवेश.

१९२९: स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेण्याचा निर्धार.

१९३०: दीड वर्ष ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे बातमीदार.

१९३०: असहकाराच्या (कायेदभंग) चळवळीत सहभाग व १८ महिन्यांच्या शिक्षा.

१९३३: मे महिन्यात तुरुंगातून सुटका.

१९३४: मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश.

१९३५: महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य.

१९३८: इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून बी.. प्राप्त.पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश.

१९३६: रॉयवादी विचारसरणीच्या छायेत.

१९४०: सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष.

१९४१: एल.एल.बी. परीक्षा पास, वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ.

१९४२: २ जून रोजी कर्हाचड येथे फलटण येथील मोरे कुटुंबातील वेणूताईंशी विवाहबद्ध.

१९४२: महात्मा गांधींच्या चले जाव आंदोलनात सामील.

१९४२: सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत प्रवेश.

१९४३: सर्वांत थोरले बंधू ज्ञानोबा यांचे निधन.

१९४४: तुरुंगवास.

१९४५: तुरुंगातून सुटका.

१९४६: मुंबई इलाखा कायदे मंडळाच्या निवडणुकीत दक्षिण सातारा निवड.

१९४६: १४ एप्रिल रोजी गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड.

१९४७: १५ डिसेंबर रोजी मधले बंधू गणपतराव यांचे निधन.

१९४८: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस.

१९५२: कर्हाषड मतदारसंघातून विधानसभेवर निवड, नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती.

१९५६: ऑक्टोबरमध्ये लोकसभेचा विदर्भासह विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्याच्या बाजूने कौल.

१९५६: १ नोव्हेंबर रोजी विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड.

१९५७: एप्रिलमध्ये मुंबई विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्हााड येथून विजयी व पुनश्च मुख्यमंत्रीपद.

१९५८: सप्टेंबरमध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर निवड.

१९६०: एप्रिलमध्ये लोकसभेचे द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करून मुंबईसह महाराष्ट्र व गुजराथ अशा दोन राज्यांच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब

१९६०: १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी

१९६०: नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.

१९६१: जानेवारीमध्ये काँग्रेस महासमितीतून निवडणूक पद्धतीने प्रथमच झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड.

१९६२: फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड विजय.

१९६२: २२ नोव्हेंबर रोजी भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.

१९६३: नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.

१९६५: १८ ऑगस्ट रोजी आई विठामाता यांचे निधन.

१९६६: १४ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती.

१९७०: २६ जून रोजी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.

१९७२: सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड.

१९७४: ऑक्टोबरमध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती.

१९७७: लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून निवड.

१९७८: इंदिरा गांधी यांच्याबरोबर मतभेद होऊन संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश.

१९७९: जुलैमध्ये चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान व गृहमंत्री.

१९८०: सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड.

१९८२: इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश.

१९८२: आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.

१९८३: १ जून रोजी पत्नी सौ. वेणूताई यांचे निधन.

१९८४: २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे सायंकाळी ७.४५ वाजता निधन.

१९८४: २७ नोव्हेंबर रोजी कर्हाीड येथे कृष्णाकोयनेच्या प्रीतिसंगमावर अंत्यसंस्कार.

यशवंतरावांची ग्रंथसंपदा

 • आपले नवे मुंबई राज्य (..१९५७)
 • ॠणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
 • कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४)
 • भूमिका (१९७९)
 • महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
 • विदेश दर्शन – (यशवंतराव यांनी परदेशाहून सौ.वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)

यशवंतराव चव्हाण यांचेवरील साहित्य

यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही पुस्तके अशी :

 • यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
 • यशस्वी यशवंतराव (रा..गुरव)
 • यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
 • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
 • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)
 • आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
 • यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
 • Chavan,The Man of Crisis (B.B.Kala)
 • Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
 • Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
 • Man of Crisis (Baburao Kale)
 • YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
 • यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
 • सोनेरी पाने (भा.वि.गोगटे)
 • यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
 • घडविले त्यांना माऊलीने (.शं. खोले)
 • ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)
 • यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
 • मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के.पवार)
 • नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
 • कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
 • वादळ माथा (राम प्रधान)
 • यशवंतराव चव्हाण चरित्र (अनंतराव पाटील)
 • भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
 • यशवंतराव चव्हाण (प्रा.डॉ.कायंदे पाटील)

भाषण संग्रह / पुस्तिका

 • असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख १९६८)
 • उद्याचा महाराष्ट्र – (चव्हाण यांची भाषण पुस्तिका १९६०)
 • काँग्रेसच्या मागेच उभे राहा औरंगाबाद येथील भाषण पुस्तिका
 • कोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन पुस्तिका १९६०)
 • .वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका १९६१)
 • जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका १९७३)
 • पत्र संवाद (संपादक: .मा.गर्गे २००२)
 • पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिकापुस्तिका )
 • महाराष्ट्रम्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका १९६०)
 • महाराष्ट्राची धोरण सूची – (पुस्तिका १९६०)
 • यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ १९७१
 • युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह १९७०)
 • लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका१९५७)
 • वचनपूर्तीचे राजकारण अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका १९६९))
 • विचारधारा – (भाषण संग्रह १९६०)
 • विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) – (भाषण पुस्तिका १९६०
 • शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे २०००; संपादक: राम प्रधान)
 • शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) – तळवळकर गोविंद व लिमये अ.. प्रकाशक पुणे, व्हीनस बुक स्टॉल १९६१
 • सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह १९६२)
 • हवाएँ सह्याद्रिकी (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)
 • India’s foreign Policy – १९७८
 • The Making of India’s Foreign Policy – १९८०
 • Winds of Change – १९७३