मी मेंदूच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये माझ्यावर या शस्त्रक्रियेसाठी साडेतीन लाख रुपये खर्चाची आवश्यकता होती. मात्र आमची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने उपचार शक्य नव्हते. समोर साक्षात मृत्यू दिसत होता. पण मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी माझ्या शस्त्रक्रियेचा आणि त्यासाठी कराव्या लागलेल्या सर्व महागड्या तपासण्यांचा खर्चही केला. सतीशभाऊ म्हणजे जीवदान देणारा भाऊ आहे. मी त्यांचे आभार नाही मानू शकत. त्यांचे रुग्णसेवक दादांनी आम्हाला काहीही कमी पडू दिले. मी सतीशभाऊंसारखा देव माणूस आयुष्यात पाहिला नाही.

सौ. लक्ष्मीबाई सखाराम टापरे,

खडकपुरा, नांदेड.