मी सर्वसाधारण कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. माझा मुलगा युवराज काटमोरे वय 9 वर्षे. तो जन्मत: मुका आणि बहिरा आहे. त्याचा इलाज करण्यासाठी 8 ते 9 लाख रुपये खर्च येणार होता. एवढा मोठा खर्च करण्याचा आम्ही विचारही करु शकत नव्हतो. परंतु आम्हाला माहिती मिळाली की, सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत गोर- गरीब रुग्णांना मदत करतात. तेंव्हा भाऊंशी भेट घेऊन बोलणे झाले आणि आम्ही मुंबईला गेलो. तेथील कर्मचार्‍यांनी आमची व्यवस्था आमदार निवासात केली. जसलोक दवाखान्यात आम्हाला उपचारासाठी नेले. दवाखान्याचे 8,50,000 रुपये एवढे बील झाले होते, पण आम्हाला एक रुपयाही खर्च लागला नाही. देव माणूस असलेल्या सतीशभाऊंनी हा सर्व खर्च उचलला. ज्या वेळी आमचा मुलगा बोलला त्यावेळी आमच्या डोळ्यांतून अश्रू आले. मुलगा बोलला की आम्हाला आदरणीय सतीशभाऊंची आठवण येते. भाऊंचे उपकार आम्ही जीवनभर विसरणार नाही, व त्याची परतफेडही करु शकत नाही. पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, आपण सतत आमदार रहावे. मंत्री व्हावे व माझ्या मुलाप्रमाणे गोर गरीबांना आपल्यामुळे वाचा मिळावी.

भास्कर अंबादास काटमोरे, परतूर, जि. जालना