औरंगाबाद शहरात अनेक विद्यार्थी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. सोबतच हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारीही करतात. हे सर्व विद्यार्थी मराठवाडा विभागासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातून औरंगाबादला आलेले. कोरोनामुळे संपूर्ण भारतभर मार्च महिन्यापासून शंभर टक्के लॉकडाऊन होता. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जवळचे राशन, पैसे संपले होते. अडचणी येतात पण ही अडचण फारच अनपेक्षित होती. अशा वेळी काय करावे? अनेक प्रश्न समोर होते. आणि त्यातच अचानक आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांनी संपर्कातील काही विद्यार्थ्यांना फोन करून सर्वांच्या अडचणी विचारल्या. त्यावेळी आम्ही सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. भाऊंनी तात्काळ विद्यापीठ परिसरात राहणार्‍या विद्यार्थ्यांची यादी मागवली, आणि त्याच दिवसापासून पुढे सलग दोन महिने प्रत्येक गरजू विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या रूमवर जेवणाच्या डब्याची व्यवस्था केली. ही सर्वात महत्त्वाची समस्या भाऊंनी त्या कालावधीत सोडवली. त्यामुळे निश्चिंतपणे आम्ही अभ्यास करू शकलो. लॉकडाऊनच्या काळात एवढी मोठी मदत! तीही घरपोच देणे सोपे नव्हते.  भाऊंनी सर्व विद्यार्थ्यांची अडचण दूर केली. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सक्रिय कामातून बळ दिलं. मार्च आणि एप्रिल हे टाळेबंदीचे दोन महिने आठवले की आदरणीय भाऊंची व त्यांच्या कामाची तीव्र आठवण येते.

खरंच आदरणीय भाऊ पदवीधरांचे कृतिशील असे सच्चे प्रतिनिधी आहेत.

भाऊंचे लाख लाख आभार मानतो

.- प्रविण साळुंके, मालुंजा,

ता गंगापूर जि. औरंगाबाद