मी औरंगाबाद येथे किरायाने खोली करून एमपीएससी पोलीस भरतीची तयारी करत होते. मात्र कोविड-19 या विषाणूमुळे संपूर्ण भारतात केंद्र सरकारने 23 मार्चपासून टाळे बंदी लागू केली. आणि आम्ही तयारी करणारे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी औरंगाबाद येथे अडकून पडलो. या अचानक टाळेबंदीमुळे रूमच्या बाहेरसुद्धा पडता येत नव्हते. जवळच्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला होता. पैशांसह सर्वच गोष्टींची अडचण भासत होती. परिस्थिती अशी होती की घरीसुद्धा जाता येत नव्हते. तेव्हा आमच्या या अवस्थेची माहिती पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांना कळाली. म्हणतात ना मार्ग बंद असले तर देव आपले दूत पाठवतो, अगदी तशीच किमया झाली. आदरणीय भाऊंनी आमच्या रूमवर स्वयंसेवक पाठवून तर काही ठिकाणी स्वतः येऊन, विद्यार्थ्यांना राशनच्या कीट दिल्या. संकट काळात भाऊंनी पुरवलेल्या राशनमुळे आम्हा सगळ्यांना मोठा दिलासा मिळाला. जवळपास दोन महिने पुरेल एवढे धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भाऊंनी स्वतः केला. पदवीधरांचा खराखुरा आमदार म्हणून भाऊंचा हा वेगळा चेहरा आम्हाला दिसला. या सहकार्यासाठी भाऊंची मी आयुष्यभर ऋणी असेल. त्यांनी केलेली ही मदत आम्हा सर्वांसाठी खूपच मोलाची होती.
– पूजा राजपूत, शिवाजी नगर, जालना