प्रथमतः आमदार श्री.सतीशभाऊ चव्हाण व मा.आ.अमरसिंह पंडित साहेब यांचे मी शतशः आभार मानतो. मला कर्करोगाचा आजार झाला होता. मी घाबरून न जाता मा.अमरसिंह पंडित यांना आजाराबद्दल कानावर घातले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मा.सतीशभाऊ चव्हाण यांना कल्पना देऊन मला मुंबई येथे उपचारसाठी पाठवले. मा.सतीशभाऊ चव्हाण यांनी कै.भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्यावरील कर्करोगाची शस्त्रक्रिया विनामूल्य करून दिली. शिवाय मुंबई येथील आमदार निवासस्थानी माझी व माझ्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. देवदुतासारखी रुग्णांची सेवा करणारे, आजारपणात प्रचंड मेहनत घेणारे असे भाऊंचे रुग्णसेवक माऊलींनी काहीही कमी पडू दिले नाही. ग्रामीण भागातील लोकांना साधा उत्पन्नाचा दाखला जरी काढायचा असला तरी नाकी नऊ येतात. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटीत मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येणार्‍या सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारे भाऊंचे रुग्णसेवक कर्मचारी आहेत. वैद्यकीय कक्षात आलेली कोणतीही गरजवंत व्यक्ती कधी रिकाम्या हाताने जात नाही, ह्याचा मला अनुभव आला. पूर्वीप्रमाणे संसारात हसत खेळत मिसळू शकलो ते आदरणीय भाऊंमुळेच.

– पंकज पाटेकर, रा. गेवराई, जि. बीड.