माझा मुलगा ऋषीकेशला जन्मापासूनच हार्टच्या वॉलचा प्रॉब्लेम होता. त्यासाठी फार मोठा खर्च लागत असल्याने तो माझ्या आवाक्याबाहेर होता. आपल्या लेकरावर उपचार करण्यासाठी मला खूप हतबल असल्यासारखे वाटले.
यासर्व धावपळीत असताना आ. सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य करतात ह्याची मला माहीती मिळाली. आम्ही मुंबईला आमदार निवासात जाऊन आदरणीय भाऊंची भेट घेतली. त्यांना सर्व हकिकत सांगितली. त्यांनी खूप आधार दिला आणि एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलला घेऊन गेले. सर्व तपासण्या आणि ऑपरेशनसाठी लागणारा 465000/- रूपये इतका खर्च मोफत करून दिला. तसेच राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही केली. आदरणीय आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्यामुळे आज माझा ऋषी ठणठणीत आहे. आम्ही भाऊंचे उपकार कधीच विसरू शकत नाही.
– देविदास दत्तात्रय कोल्हे,
गरूड चौक, महादेवनगर, लातूर