माझी मुलगी जान्हवी वय 5 वर्ष. ती जन्मतः मूक बधिर होती. ती बोलत नव्हती आणि ऐकूही येत नव्हते. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील असून मुलीवरील शस्त्रक्रिया करण्या इतपत खर्च करण्याची माझी परिस्थिती नव्हती. माझ्या चिमुकलीचे भविष्य आता अंधारातच राहणार आहे की काय? असं वाटत होते. पण, आदरणीय आ.सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या माध्यमातून गोरगरीब रूग्णांना मदत करतात असे कळाले. मी तात्काळ  औरंगाबाद येथे भाऊंना भेटलो. डॉक्टरांनी आठ लाख रुपये खर्च सांगितला होता पण आदरणीय सतीशभाऊंच्या वतीने सर्व खर्च करण्यात आला. आमची सगळ्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. माझ्या 5 वर्षाच्या लेकीला आता नवे आयुष्य मिळाले आहे. आम्ही सर्व कुटुंबीय भाऊंचे आभार मानून कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो.

गंगाधर अनंतराव गायकवाडमु. पो. उखळी, ता. औंढा नाग., जि. हिंगोली