मागील दहा वर्षांपासून माझी पत्नी सौ. कमलाबाई सावने स्पाईनकॉड आजाराने त्रस्त होती. अनेक उपचार आणि प्रयत्न करून शेवटी एका वर्तमानपत्रातील बातमी वाचून परभणी येथील भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिरात सहभागी झालो. शिबिरातील तज्ज्ञ डॉ. आबू चिनिया यांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी सूचवले. आम्ही शैफी हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल झाल्यानंतर डॉ. अमीत शर्मा सरांनी या ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये खर्च लागणार आहे असे सांगितले. हे ऐकून धडकीच भरली. आता यापुढे आपण ट्रीटमेंट करू शकत नाही असे मनोमनी गृहीत धरले होते, मात्र आदरणीय आ. सतीशभाऊ चव्हाण यांनी सर्व खर्च केला आणि त्यांचे मुंबई येथील रुग्णसेवक यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यामुळे माझी पत्नी दहा वर्षांच्या त्रासदायक आजारातून मुक्त झाली. आदरणीय आ. सतीशभाऊ चव्हाण यांचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही.

उत्तम माणिकराव सावणे,

रा. पिंपरी देशमुख, ता. जि. परभणी