डिसेंबर 2016 मध्ये विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याव्दारे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी माझ्यासह तत्कालीन विरोधी पक्षनेते मा.धनंजयजी मुंडे, तत्कालीन आ.अमरसिंह पंडित यांनी सभागृहात केली होती. आमच्या मागणीची दखल घेत तत्कालीन महसूल मंत्र्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा 31 व मागासवर्गीय उमेदवाराची वयोमर्यादा 34 वर्ष ग्राह्य धरण्यात येणार असल्याची घोषणा 16 डिसेंबर 2016 रोजी विधान परिषदेत केली