नॅशनल करिअर सर्विस श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद, बीड जिल्ह्यात ‘नोकरी महोत्सव’ आयोजित करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवात अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. असंख्य तरूणांना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार मिळाला व त्यांचे आयुष्य स्थिरावले.