नांदूर-मधमेश्वर कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडा, या मागणीसाठी मी, तत्कालीन आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ.सुभाष झांबड यांनी एकत्र येत 20 ऑगस्ट 2016 रोजी पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसात पाणी सोडा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आम्ही जिल्हा प्रशासनास दिला होता. अखेर आमच्या उपोषणाच्या इशार्यावर प्रशासन नमले व औरंगाबादच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन वैजापूर व गंगापूर तालुक्यातील गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नांदूर-मधमेश्वरधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. व अंमलात आणला.