धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळी सुधारणा करण्यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत होतो. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सदरील दुरूस्त्या मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र यासंदर्भात काहीच कार्यवाही झाली नाही. अखेर महाविकास आघाडी सरकारने धर्मादाय संघटनेतील पदोन्नती साखळीत समतोल साधणे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम 5 मधील पोट-कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास 29 जुलै 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. 2017 पासून मी यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करत असलेला हा प्रश्न मार्गी लागला