सामाजिक जाणिवेतून मागील तेरा वर्षांपासून औरंगाबादेत दिपावलीनिमित्त ‘दिवाळीपहाट’ या सूरमयी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येत आहे. औरंगाबादकर रसिकांचा दरवर्षी या कार्यक्रमाला भरूभरून प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत प्रख्यात सिनेगायक श्री.रविंद्र साठे, श्रीमती उत्तरा केळकर, श्रीमती वैशाली सामंत, पं.उपेंद्र भट, श्री.श्रीकांत नारायण, श्रीमती प्रियंका बर्वे, जेष्ठ संगीतकार श्री.अशोकपत्की, श्रीमती किर्ती किल्लेदार, श्री.मंगेश बोरगांवकर, श्री.प्रसाद कुलकर्णी, श्रीमती सुस्मिरता डवाळकर, ‘सारेगमप’ उपविजेती डॉ.नेहा वर्मा, श्रीमती अपूर्वा गज्जला, प्रख्यात पखवाज वादक पं.उध्दवबापू आपेगांवकर, श्री.सुनील कुलकर्णी, श्री.निशांत घाटे, पं.नाथराव नेरळकर, प्रसिध्द सूत्रसंचालक श्री.सुधीर गाडगीळ, श्री.अतुल परचुरे, श्री.प्रशांत दामले, श्री.पुष्कर श्रोत्री, श्रीमती समिरा गुजर-जोशी, श्री.संकर्षण कर्‍हाडे आदींची उपस्थिती लाभली आहे. या कार्यक्रमात दरवर्षी संगीतक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या मराठवाड्यातील कलांवतांचा यथोचित गौरव करण्यात येतो. यात पं.नाथराव नेरळकर, आंध्रलता आशालता करलगीकर, शाहीर मीराबाई उमप, पं.विजय देेशमुख, पं.विश्‍वनाथ ओक आदींचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.