डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विना-अनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शुल्कवाढ केली होती. ही शुल्कवाढ त्वरित रद्द करावी या मागणीसाठी मी जुलै 2015 मध्ये विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरुंची भेट घेतली. मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. वाढीव शुल्कांमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडून ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे शुल्कवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली होती. कुलगुरूंनी माझ्या या मागणीची तात्काळ दखल घेत ही शुल्कवाढ रद्द केली.