डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2014 या कालावधीत आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा महोत्सवात तलवारबाजी खेळाचा समावेश करावा अशी मागणी तत्कालीन कुलगुरूंकडे केली होती. माझ्या मागणीची दखल घेत विद्यापीठाने आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात तलवारबाजीचा समावेश केला. त्यामुळे या खेळातील खेळाडूंना आपले प्राविण्य राष्ट्रीय स्तरावर दाखवता आले.