डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रासाठी अधिग्रहित केलेल्या भूखंडापोटी एमआयडीसी आकारत असलेले सेवा शुल्क रद्द करण्यासंदर्भात मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. यासंदर्भात 25 ऑगस्ट 2020 रोजी उद्योगमंत्री मा.ना.सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्यासह मी देखील उपस्थित होतो. सदरील सेवा शुल्क रद्द करावे असे आदेश मंत्री महोदयांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.