कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू अशा दहा हजार कुटुंबांना ‘किराणा कीट’चे वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी ‘लॉकडाऊन’ वाढवला. त्यामुळे हातावर पोट असणार्या गोरगरीब नागरिकांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या संकटाच्या काळात अशा नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून औरंगाबाद शहरासह विविध तालुक्यातील गरजू नागरिकांना ‘किराणा कीट’ वाटप केले. या कीटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तूरदाळ, तेल, मिरची पावडर, हळद, मसाला, मीठ आदी साहित्य होते.