कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख कुटुबांना ‘आर्सेनिक अल्बम-30’ होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. ‘आर्सेनिक अल्बम-30’ या होमिओपॅथी औषधीला केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली असून ही औषधी घेतल्यानंतर व्यक्तीवर कुठलाही साईड ईफेक्टस् होत नाही. उलट नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास निश्चित मदत होते. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिकांमधून या औषधीची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने माझ्यावतीने या औषधीचे मोफत वाटप केले. यासाठी फोस्टर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे सहकार्य मिळाले. औरंगाबाद शहरातील सर्व भागासह गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड आदी तालुक्यात या औषधीचे वाटप करण्यात आले.