कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ‘सॅनिटायझर’चा तुटवडा जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार श्री.रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्यावतीने ‘सॅनिटायझर’ची निर्मिती करण्यात येत आहे. 7 मार्च 2020 रोजी बारामती अॅग्रोच्यावतीने औरंगाबाद येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाला 400 लिटर तर पोलिस अधीक्षक कार्यालयास 100 लिटर ‘सॅनिटायझर’ मोफत देण्यात आले. मी स्वत: हे सॅनिटायझर औरंगााबद जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले.