कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनधील इतर देशातील अनेक उद्योग कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्थलांतरित उद्योगांना औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत (ऑरिक) आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी मी 26 एप्रिल 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, उद्योग मंत्री मा.ना.सुभाषजी देसाई यांच्याकडे केली होती. चीनमधून स्थलांतरित होणार्या उद्योग कंपन्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत (ऑरिक) आल्या तर राज्यासह मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात नक्कीच भर पडेल. शिवाय औरंगाबादसह मराठवाड्यातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल असे मी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. उद्योगमंत्र्यांनी देखील मला यासंदर्भात शासन सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे सांगितले