कला व इतर शाखांमधील करीअर

) Master in Library Science / Master in Geology

ज्यांना ग्रंथपाल होण्याची इच्छा आहे किंवा ग्रंथालय क्षेत्रातील विविध कामे करण्याची इच्छा आहे, त्यांना या क्षेत्रात अनेक संधी आहेत. या क्षेत्रातील बी.लिब. या पदविद्वारे सुरुवात करता येते. परंतु भविष्यकालीन संधीसाठी किमान पदव्युत्तर

पदवी (एम.लिब.)प्राप्त करणे श्रेयस्कर ठरते. सर्व विद्यापीठात हे कोर्स शिकण्याच्या संधी उपलब्ध आहेत. इतिहास विषयात पदवी प्राप्त विद्यार्थी Master in Mu geology हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय यात काम करण्याच्या, क्युरेटर इत्यादी म्हणून काम करण्याची संधी मिळते.

) Hospital Administration

जेवढे रोग तेवढे दवाखाने व त्यांचे स्पेशलायझेशन युनिट, या न्यायाने वैद्यकीय क्षेत्रात हॉस्पिटल्सची संख्या आणि विस्तारीकरण जोर धरत आहे. यासाठी प्रशासनाचे काम गुंतागुंतीचे व मोठे आहे. म्हणून Hospital Administration मध्ये खास शिक्षित व्यक्तींना करीअरच्या मोठया संधी आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर प्रवेश मिळवू शकतो. एक/दोन वर्ष एखाद्या रुग्णालयात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव असणे चांगले. १ वर्षाचा अभ्यासक्रम व ६ महिने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यावर नोकरी मिळू शकते.

) Hospitality, Travel and Tourism

भारतात पर्यटन व्यवसाय झपाटयाने वाढतो आहे. त्या प्रमाणात तंत्र प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. त्यामुळे या सतत वृद्धी होत असलेल्या क्षेत्रात करीअरच्या बहुमोल संधी उपलब्ध आहेत. पदवीधर व्यक्तींसाठी एक/दोन वर्षे कालावधीचे विविध अभ्यासक्रम आहेत. पर्यटन तसेच हॉटेल क्षेत्रात लोकांशी कसे वागावे, त्यांना योग्य माहिती देणे, योग्य तऱ्हेने सेवा पुरविणे, इत्यादींचा अभ्यासक्रमात समावेश असतो. याशिवाय पर्यटन संस्थांनी स्वतःच्या विशिष्ट गरजांसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळावे म्हणून ६ महिने ते दोन वर्ष अवधीचे विविध छोटेमोठे अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्यांचाही लाभ घेता येतो. मृदुभाषी, संभाषण चतुर, तत्परता इत्यादी गुण असणाऱ्यांनी किंवा असे गुण प्रयत्नपूर्वक आत्मसात करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र उपयुक्त आहे.