डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास 2 जानेवारी 2020 रोजी सदिच्छा भेट देऊन विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या पदोन्नती, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित काम देण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे केली. तसेच विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी केली. विद्यापीठाने देखील माझ्या मागणीची दखल घेत कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात भरीव अशी वाढ केली.