औरंगाबाद शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयातील मुलांचे व मुलींचे वसतिगृह महानगरपालिकेला एप्रिल ते जून 2020 या कालावधीत ‘क्वारंटाईन सेंटर’ म्हणून वापरण्यास दिले. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी मुलींच्या वसतिगृहात 116 बेडची तर मुलांच्या वसतिगृहात 206 बेडची व्यवस्था करून देण्यात आली. मंडळाच्या लोहारा जि.उस्मानाबाद येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय देखील ‘क्वारंटाईन सेंटर’ म्हणून वापरण्यास दिले. तर जून 2020 पासून औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहातील ‘क्वारंटाईन सेंटर’चे रूपांतर ‘कोविड सेंटर’मध्ये करण्यात आले. आता याठिकाणी प्रत्यक्ष कोरोना बाधितांवर उपचार केल्या जातात. तसेच ‘क्वारंटाईन सेंटर’ व ‘कोविड सेंटर‘मध्ये राहणाऱ्या रूग्णांना तसेच संशयित रुग्णांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सकाळी चहा-बिस्कीट, नास्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा-बिस्कीट, रात्री जेवण दिल्या जात आहे.