औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मी रू.9.35 लाखाचा आमदार निधी दिला. याठिकाणी मल्टी पॅरा मॉनिटर, डिजिटल बी.पी.ऑपरेटर, डिजिटल प्लस्कोमिटर, बेबी ट्रॉली, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर, रेडीयंट वार्मर, पल्स ऑक्सीमीटर, सिरींग पंप, फोटो थेरपी, पोर्टेबल सक्शन, इन्फ्रा रेड थर्मामीटर, डिजिटल इन्फांट वेविंग स्केल, सेल्फ इन्फ्लेटिंग बॅग, लायरनगोस्कोप, ऑक्सिजन हूड आदी यंत्रसामुग्री या आमदार निधीतून खरेदी करण्यात आली.