औरंगाबाद येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील लघुउद्योजकांनी माझी भेट घेवून त्यांना भेडसावणार्या अडीअडचणी माझ्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी 19 जुलै 2018 रोजी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. लघुउद्योजकांच्या शिष्टमंडळासह उद्योगमंत्री मा.ना.सुभाषजी देसाई यांच्या दालनात 14 मे 2018 रोजी बैठकही झाली. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.