औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरू व्हावे यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. दि.16 सप्टेंबर 2008 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.विलासराव देशमुख मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त औरंगाबादेत आले असता; त्यांची वकीलांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन विधी विद्यापीठ औरंगाबादेत सुरू व्हावे अशी मागणी केली होती. त्यानंतर शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करतांना 13 मार्च 2013 रोजी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांना सोबत घेऊन विधान भवनासमोर धरणे आंदोलन केले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबादेत विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, व हे विधी विद्यापीठ औरंगाबादेत सुरू झाले. विधी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर 21 मार्च 2017 रोजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.एस.सूर्यप्रकाश यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अखेर हा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यश आले.