वैजापूर व गंगापूर तालुक्यातील गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नांदूर-मधमेश्वरधून पाणी सोडण्याचा निर्णय

नांदूर-मधमेश्वर कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडा, या मागणीसाठी मी, तत्कालीन आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ.सुभाष झांबड यांनी एकत्र येत 20 ऑगस्ट 2016 रोजी पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसात पाणी सोडा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आम्ही जिल्हा प्रशासनास दिला होता. अखेर आमच्या उपोषणाच्या इशार्यावर प्रशासन नमले व औरंगाबादच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.निधी […]

Read More ⇾

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची प्रलंबित रक्कम अदा करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न..

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची प्रलंबित रक्कम अदा करण्यासंदर्भात 8 डिसेंबर 2016 रोजी हिवाळी अधिवशेनात मी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. सन 2013 पासून राज्यात विशेषत: मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनाचे कोट्यावधी रूपयांचे अनुदान प्रलंबित होते. सततची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना व्याजासह अनुदानाची थकीत रक्कम वाटप करण्यात यावी, अशी आग्रही मागणी माझ्यासह तत्कालीन आ.अमरसिंह […]

Read More ⇾

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे अशी आग्रही मागणी

मराठवाडा विभागाच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडताना शासनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने यासंदर्भात 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे अशी आग्रही मागणी सभागृहात केली. तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर मराठवाड्यातील आमदारांचे समाधान न झाल्याने सभापतींनी यासंदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश दिले.

Read More ⇾

महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद येथेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे असून सदरील कार्यालय पुणे येथे स्थलांतर करण्याविषयी शासनस्तरावर प्रयत्न केले जात होते. ही बाब लक्षात येताच सदरील कार्यालयाच्या स्थलांतर प्रक्रियेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी मी 25 मे 2018 रोजी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे केली. अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव यांनी यासंदर्भात […]

Read More ⇾

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा प्रथम टप्पा पूर्ण..

पैठण तालुक्यातील दुष्काळी गावांना जायकवाडी धरणातून सिंचन व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन भाग-2 योजना 2009 साली हाती घेण्यात आली होती. मात्र 2014 नंतर ही योजना निधी अभावी रखडली. योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने मी यासंदर्भात 25 जून 2019 रोजी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. लक्षवेधीव्दारे […]

Read More ⇾

धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळी सुधारणा प्रश्न मार्गी लागला..

धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळी सुधारणा करण्यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत होतो. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सदरील दुरूस्त्या मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र यासंदर्भात काहीच कार्यवाही झाली नाही. अखेर महाविकास आघाडी सरकारने धर्मादाय संघटनेतील पदोन्नती साखळीत समतोल साधणे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम 5 मधील पोट-कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास 29 जुलै […]

Read More ⇾

शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरू..

औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरू व्हावे यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. दि.16 सप्टेंबर 2008 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.विलासराव देशमुख मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त औरंगाबादेत आले असता; त्यांची वकीलांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन विधी विद्यापीठ औरंगाबादेत सुरू व्हावे अशी मागणी केली होती. त्यानंतर शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करतांना 13 मार्च 2013 रोजी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांना सोबत घेऊन […]

Read More ⇾

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता तात्पुरत्या नियुक्त्या न करण्याबाबतचा शासन निर्णयास स्थगिती

शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने 6 मार्च 2018 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता पदावर 360/120 दिवसांकरिता तात्पुरत्या नियुक्त्या न करण्याबाबतचा शासन निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 450 सहायक प्राध्यापक पदावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणार्या डॉक्टरांच्या नौकर्या संपुष्टात येणार होत्या. तसेच या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय महाविद्यालय शिक्षण व रूग्णालयातील रूग्ण सेवा […]

Read More ⇾

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब घेण्यासाठी टेस्टिंग लॅब कार्यान्वित

कोरोना व्हायरसने घातलेल्या विध्वंसक धुमाकुळीच्या पार्श्वभूमीवर विषाणुविषयक संशोधन व निदान करणारे नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर मराठवाड्यात नव्हते. संशयित रूग्णांचे स्वॅबचे नमुने पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी कार्यान्वित असलेल्या व्हायरॉलॉजी सेंटरवरून तपासून आणावे लागत असे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे, मुंबई, नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यात देखील हे सेंटर त्वरित सुरू करावे अशी मागणी मी 18 मार्च […]

Read More ⇾

औरंगाबाद घाटीतील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला

औरंगाबाद शहरातील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल 2020 या महिन्यांचे वेतन शासनाकडे थकीत होते. याठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याने घाटीतील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचारी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून उत्स्फूर्तपणे काम करून रूग्णांची योग्य ती काळजी घेत होते. मात्र वेळेवर पगार न झाल्याने त्यांच्या समोर […]

Read More ⇾