क्रीडा महोत्सवात तलवारबाजी खेळाचा समावेश

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2014 या कालावधीत आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा महोत्सवात तलवारबाजी खेळाचा समावेश करावा अशी मागणी तत्कालीन कुलगुरूंकडे केली होती. माझ्या मागणीची दखल घेत विद्यापीठाने आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात तलवारबाजीचा समावेश केला. त्यामुळे या खेळातील खेळाडूंना आपले प्राविण्य राष्ट्रीय स्तरावर दाखवता आले.

Read More ⇾

मराठवाड्यातील तालुका क्रीडा संकुलांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत..

मराठवाड्यातील तालुका क्रीडा संकुलांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत 17 जुलै 2018 रोजी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेेधले. मराठवाड्यातील कोणत्याच तालुका क्रीडा संकुलाचे काम समाधानकारक नसून बहुतांश तालुका क्रीडा संकुलांना शासकीय भूखंड उपलब्ध झालेले नाहीत. ज्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. क्रीडा संकुलांना विविध खेळांची मैदाने, क्रीडा साहित्य, […]

Read More ⇾

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी..

राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा तसेच खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवे दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी व्हावा, यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त […]

Read More ⇾