आदरणीय शरद पवार साहेबांसोबत नेदरलँड देशाचा कृषी विषयक अभ्यास दौरा

आदरणीय शरद पवार साहेबांसोबत 9 ते 15 जुलै 2016 मध्ये नेदरलँड देशाचा कृषी विषयक अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली. यामध्ये माझ्यासह तत्कालीन विरोधी पक्षनेते मा.धनंजय मुंडे, मा.आ.अमरसिंह पंडित आदींचा समावेश होता. खरे तर नेदरलँड देशाने कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल मी फार ऐकून होतो. मात्र प्रत्यक्षात नेदरलँडमध्ये जाऊन तेथील कृषी क्षेत्राचा झालेला विकास पाहता आला आणि […]

Read More ⇾

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नांदूर-मधमेश्वरधून पाणी सोडण्याचा निर्णय

नांदूर-मधमेश्वर कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडा, या मागणीसाठी मी, तत्कालीन आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ.सुभाष झांबड यांनी एकत्र येत 20 ऑगस्ट 2016 रोजी पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसात पाणी सोडा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आम्ही जिल्हा प्रशासनास दिला होता. अखेर आमच्या उपोषणाच्या इशार्यावर प्रशासन नमले व औरंगाबादच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.निधी […]

Read More ⇾

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची प्रलंबित रक्कम अदा करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न..

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची प्रलंबित रक्कम अदा करण्यासंदर्भात 8 डिसेंबर 2016 रोजी हिवाळी अधिवशेनात मी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. सन 2013 पासून राज्यात विशेषत: मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनाचे कोट्यावधी रूपयांचे अनुदान प्रलंबित होते. सततची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना व्याजासह अनुदानाची थकीत रक्कम वाटप करण्यात यावी, अशी आग्रही मागणी माझ्यासह तत्कालीन आ.अमरसिंह […]

Read More ⇾

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे अशी आग्रही मागणी

मराठवाडा विभागाच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडताना शासनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने यासंदर्भात 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे अशी आग्रही मागणी सभागृहात केली. तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर मराठवाड्यातील आमदारांचे समाधान न झाल्याने सभापतींनी यासंदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश दिले.

Read More ⇾

महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद येथेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे असून सदरील कार्यालय पुणे येथे स्थलांतर करण्याविषयी शासनस्तरावर प्रयत्न केले जात होते. ही बाब लक्षात येताच सदरील कार्यालयाच्या स्थलांतर प्रक्रियेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी मी 25 मे 2018 रोजी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे केली. अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव यांनी यासंदर्भात […]

Read More ⇾

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा प्रथम टप्पा पूर्ण..

पैठण तालुक्यातील दुष्काळी गावांना जायकवाडी धरणातून सिंचन व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन भाग-2 योजना 2009 साली हाती घेण्यात आली होती. मात्र 2014 नंतर ही योजना निधी अभावी रखडली. योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने मी यासंदर्भात 25 जून 2019 रोजी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. लक्षवेधीव्दारे […]

Read More ⇾