महानिर्मिती, महापारेषण व महावितरण मधील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ

महानिर्मिती, महापारेषण व महावितरण मधील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात यावे अशी मागणी 21 ऑगस्ट 2019 रोजी तत्कालीन ऊर्जामंत्र्यांकडे केली होती. सदरील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ 1 एप्रिल 2018 पासून प्रलंबित होती. राज्यात जेंव्हा जेंव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेंव्हा हे अभियंते, अधिकारी व तांत्रिक कर्मचारी तन, मन धनाने धावून आलेले असल्याचे मी ऊर्जा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून […]

Read More ⇾

एमपीएससी द्वारा सहायक अभियंता पदासाठी पात्र उमेदवारांना नियुक्त्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सप्टेंबर 2013 मध्ये सहायक अभियंता पदासाठी परीक्षा घेतली होती. मार्च 2014 मध्ये एमपीएससीने पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली होती, मात्र नऊ महिने होऊनही उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या. पात्र उमेदवारांनी यासंदर्भात माझी भेट घेऊन सदरील प्रश्न निदर्शनास आणून दिला तेंव्हा विधान परिषदेत मी हा प्रश्न उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. […]

Read More ⇾

कनिष्ठ अभियंता पदांच्या एकाच दिवशी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती. जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदांकरिता होणारी परीक्षा 25 व 26 नोव्हेंबर 2019 रोजी तर बृहन्मुंबई महानगर-पालिकेच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदांकरिता घेण्यात येणारी परीक्षा 25 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात येणार होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी अर्ज करणार्या उमेदवारांना कुठली तरी […]

Read More ⇾

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग 5 प्रमाणे म्हणजे 50 लाखांपर्यंत कामे देण्याचा निर्णय

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग 5 प्रमाणे म्हणजे 50 लाखांपर्यंत कामे देण्यात यावे या मागणीसाठी मी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करीत होतो. अखेर या मागणीला यश आले व 25 ऑगस्ट 2014 रोजी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय निर्गमित केला. शासनाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र इंजिनिअर्स आसोशिएशनच्या शिष्टमंडळासह तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.छगन […]

Read More ⇾

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविले

जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील वसतिगृहात विद्यार्थ्यांना कुठल्याच सोई सुविधा मिळत नसल्याचे तेथील विद्यार्थ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात 5 एप्रिल 2016 रोजी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांनी यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे सांगून, आपण स्वत: आमदार सतीश चव्हाण यांच्याबरोबर लवकरच वसतिगृहाची पाहणी करू असे सांगितले. त्यानुसार […]

Read More ⇾

औरंगाबाद येथे सेंटर फॉर एक्सलन्ससाठी निधीची तरतूद

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी मार्च 2020 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात उत्कृष्टता केंद्र (सेंटर फॉर एक्सलन्स) स्थापन करण्याची घोषणा करून यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यामुळे विविध विषयासंबंधीच्या अत्याधुनिक व उत्कृष्ट सोई-सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात मी अनेक वर्षांपासून […]

Read More ⇾