उल्लेखनीय कार्ये

मराठवाड्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी मराठवाड्यात ‘राष्ट्रवादी नोकरी महोत्सव’ आयोजित केला. या नोकरी महोत्सवात सुमारे 10 हजाराहून अधिक सुशिक्षीत बेरोजगारांनी सहभाग घेतला होता. यातून अनेक सुशिक्षीत बेरोजगारांना टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, टाटा मोटर्स, बॉश फिनोलेक्स, हुंदाई, स्कोडा अशा नामांकित कंपन्यांमध्ये हजारो बेरोजगारांना नोकरी मिळवून दिली. अशा प्रकारचा भव्य ‘नोकरी महोत्सव’ मराठवाड्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विभागात शिक्षण घेणार्‍या अनेक विद्यार्थ्यानीं स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करत होत्या. आर्थिक परिस्थिती अभावी त्या कुठलाही क्लास न लावता तयारी करत असल्याचे समजल्यावर या गरजू विद्यार्थ्यांनींना स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणार्‍या अभंग करीअर अ‍ॅकडमीवर मोफत क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिली. त्या बरोबरच त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके देखील मोफत देण्यात आली. या विद्यार्थिंनी क्लासेससाठी पायी येजा करत असल्याचे समजल्यावर त्यांना जाण्यायेण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली.

मराठवाड्यात 2011-12 मध्ये सगळीकडेच भीषण दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. या दुष्काळाच्या झळा विद्यार्थ्यांना देखील बसत होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. घरून मिळणारी आर्थिक मदत बंद झाल्याने अनेक मुलींना शिक्षण अर्धवट सोडून परत आपल्या गावी जावे लागणार असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. ज्या मुलींची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा मुलींचे पालकत्व स्विकारून नवीन शैक्षणिक वर्षापर्यंत त्यांच्या भोजन खर्चाचा भार स्विकारला. तसेच वसतीगृहातील मुलींसाठी मोफत इंग्लिश स्पोकन क्लासेसची सोय उपलब्ध करून दिली.

दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर, स्पर्धा परीक्षा, तसेच कला, क्रीडा,सांस्कृतीक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी पालकांसह सत्कार करण्यात येतो. या गुणवंत विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून जाणीवपूर्वक हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

मराठवाड्यातील तंत्रशिक्षणाचा अनुशेष दूर करण्यासाठी 2 मे 2012 रोजी राजभवन येथे राज्यपाल के.शंकर नारायणन यांची भेट घेऊन मागण्यांसंबधी प्रस्ताव सादर केला. मराठवाड्यातील तंत्रशिक्षणाचा अनुशेष दूर करण्यासाठी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करणे, अत्याधुनिक पदविका अभ्यासक्रम सुरू करणे, अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञान पार्क सुरू करणे, प्रत्येक शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थेत अतिरिक्त वसतिगृहे बांधणे, फिनिशिंग स्कूल सुरू करणे, डिजिटील क्लास रूपची सुविधा करणे आदी मागण्यांसंबधीचा 409 कोटींचा प्रस्ताव सादर केला. तसेच यासाठी वेळोवेळी राज्यपालांकडे पाठपुरावा सुरू आहे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून देशात एमबीबीएसच्या 3000 जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यायांकडून यासाठी एकही प्रस्ताव आलेला नव्हता. त्यामुळे राज्याच्या हक्काच्या 410 जागावाढीची संधी निघून जाऊनये यासाठी मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची भेट घेऊन एमबीबीएसच्या 410 जागावाढीचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एमसीआय) सादर करण्याची विनंती केली. अखेर मा.मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी तातडीने राज्याचे मुख्यसचिव जयंत भाटिया, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव तसेच संबंधित अधिकार्‍यांना एमबीबीएसच्या जागावाढीचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे सादर करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे राज्याच्या हिताच्या 410 जागावाढीचा प्रश्न मार्गी लागला. तसेच मराठवाड्यातील नांदेड, अंबाजोगाई, लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एकून 150 जागा वाढवून मिळाल्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव कृषी विद्यापीठाच्या फेब्रुवारी 2013 रोजी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मांडून तो मंजूर करून घेतला. आज लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नामकरण कै.विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील महिला व युवती आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून उपमु‘यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2010 पासून औरंगाबाद येथील राष्ट्रवादी भवनात महिलांसाठी ‘मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत 2000 हून अधिक महिलांनी संगणकाचे ज्ञान अवगत केले आहे. याव्दारे आजपर्यंत अनेक महिलांना चांगल्या ठिकाणी रोजगार देखील मिळाला आहे. उपमु‘यमंत्री मा.अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई चव्हाण आदींनी या केंद्राला भेट देऊन या उपक‘माचे कौतुक केले आहे.

 

मराठवाड्यातील महिला व युवती आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून उपमु‘यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2010 पासून औरंगाबाद येथील राष्ट्रवादी भवनात महिलांसाठी ‘मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत 2000 हून अधिक महिलांनी संगणकाचे ज्ञान अवगत केले आहे. याव्दारे आजपर्यंत अनेक महिलांना चांगल्या ठिकाणी रोजगार देखील मिळाला आहे. उपमु‘यमंत्री मा.अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई चव्हाण आदींनी या केंद्राला भेट देऊन या उपक‘माचे कौतुक केले आहे.

 

डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील या क्षेत्रातील व्यक्ती समाजाला दिशा देत असतात. समाज उन्नत करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका घेत या घटकांचे प्रश्न गंभीरपणे समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा वेळावेळी प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात यश देखील मिळालेे.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मागील सहा वर्षांपासून मराठवाड्यात विविध ठिकाणी केंद्रीय कृषीमंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेबउपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, वृक्षारोपन, शालेय साहित्य आणि गणवेश वाटप, गरजूंना आर्थिक सहाय्य असे उपक्रम अनाथ मुलांना सोबत घेऊन राबविले जातात.

 

दहावी, बारावीनंतर शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांची माहिती नसते. या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून मागील सहा वर्षांपासून मराठवाड्यात विविध ठिकाणी ‘वेध भविष्याचा’ या करीअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले जाते. या उपक्रमांचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा झाला.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वाक्कौशल्य दिसून येते. केवळ व्यासपीठाअभावी या विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांची विवेकबुध्दी अधिक धारदार व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मागील सहा वर्षांपासून केंद्रीय कृषीमंत्री मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. संपूर्ण मराठवाड्यात सर्वप्रथम स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेर्‍या घेण्यात येतात. त्यातून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणार्‍या स्पर्धकांची ‘महाअंतिम फेरी’ घेण्यात येते. व त्यातून प्रथम, व्दितीय व तृतीय क‘मांक प्राप्त करणार्‍या स्पर्धकांना अनुक‘मे रोख रूपये 21000, 15000 11000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. विशेष म्हणजे ही स्पर्धा नि:शुल्क असते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पदवी प्रमाणपत्र (डिग्री) घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना विलंब झाला आहे, अशा विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ दंड आकारत असे. मराठवाड्यात 2012 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून हा आकारण्यात येणारा दंड माफ करण्यात यावा यासाठी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ.विजय पांढरीपांडे यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर विद्यापीठाच्या 24 सप्टेंबर 2012 रोजीे झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही मागणी मान्य करून पदवी प्रमाणपत्र (डिग्री) घेण्यासाठी आकारण्यात येणारा दंड माफ करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

महाराष्ट्र शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ‘कायम विनाअनुदान’ शब्द काढण्याचा निर्णय घेतला. परंतु कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर ‘कायम’ शब्द काढलेला नव्हता. शासनाकडे या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करत मुंबई येथे 2010 मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनासमोर धरणे आंदोलन केले. तसेच विधान परिषदेत तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित करून चर्चा घडवून आणली. त्यामुळे शासनाने 26 फेब्रुवारी 2014 रोजी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा ‘कायम’ शब्द काढण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.

उस्मानाबाद येथील मुलींच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असताना येथील वसतिगृहाची क्षमता केवळ 48 असताना प्रत्यक्षात मात्र 250 मुली त्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास निदर्शनास आले. त्यावेळी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची बाब येथील विद्यार्थिनींनी लक्षात आणून दिली. याची तात्काळ दखल घेत एप्रिल 2012 मध्ये विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून येथील मुलींच्या वसतिगृहासाठी 1 कोटी 70 लाख रू. निधी, त्याच बरोबर संगणक प्रयोगशाळा इमारतीसाठी 1 कोटी 70 लाख असा एकून 3 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर करून घेतला.

घाटी रूग्णालय औरंगाबाद व वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच वैद्यकीय शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासोबत बैठका घेऊन संबंधिताचे आर्थिक व इतर महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले. त्याचबरोबर घाटी रूग्णालय अद्यायावत होण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून दादांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी 2011 रोजी मुंबई येथे बैठक घेऊन 32 कोटींची भरीव तरतूद करून घेतली.

औरंगाबादेत विधि विधीपीठ सुरू व्हावे यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. दि.16 सप्टेंबर 2008 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त औरंगाबादेत आले असता; त्यांची वकीलांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन विधी विद्यापीठ औरंगाबादेत सुरू व्हावे अशी मागणी केली. त्यानंतर शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून 13 मार्च 2013 रोजी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांना सोबत घेऊन विधान भवनासमोर धरणे आंदोलन केले. अखेर हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले. राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबादेत विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लवकरच औरंगाबादेतविधी विद्यापीठ सुरू होणार आहे.

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेजस्विनीने बालेवाडी क्रीडा संकुलात मिळणार्‍या असुविधा लक्षात आणून दिल्या. या असुविधांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थितीत करून या प्रश्नाला वाचा फोडली. या मागणीची तात्काळ दखल घेत क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी तेजस्विनी मुळे हिला बालेवाडी क्रीडा संकुलात नि:शुल्क व्यवस्था व नि:शुल्क सराव उपलब्ध करून दिला जाईल असे जाहीर केले. त्यामुळे मराठवाड्याचा लौकिक वाढविणार्‍या एका खेळाडूंचा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यश आले.

 

श्रमिक विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादेत राष्ट्रवादी भवन येथे 13 मार्च 2012 पासून महिलांसाठी तसेच युवतींसाठी बेसिक टेलरिंग कटिंग, ड्रेस डिझाईनिंग व गारमेन्टस्, हॅण्ड एम्ब्रॉयडरी, कपड्यांपासून बॅग तयार करणे, जरदोसी वर्क, पर्सनल ब्युटीशियन, ज्वेलरी मेकिंग, ग्लास पेटिंग, मेणबत्ती तयार करणे यासह सर्टिफिकेट कोर्स इन डीटीपी, सर्टिफिकेट कोर्स इन एम.एस.ऑफिस, बालवाडी, अंगणवाडी शिक्षिका असे स्वयंरोजगाराभिमुख कोर्सेस सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला देखील महिलांचा उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे. यातून स्वावलंबी होवून मोठ्या संख्येने महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहेत.

स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावपळ करताना दिसतो. त्यामुळे मानवाला आपल्या शरीराकडेदेखील लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आज कॅन्सर, ह्दयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. या रोगांवर उपचार करण्यासाठी लागणारा लाखो रूपयांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहेग्रामीण भागातील जनतेची आरोग्य समस्येमुळे होणारी परवड टाळता यावी म्हणून वडील कै.भानुदासराव चव्हाण यांच्या नावाने भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना करून या माध्यमातून मराठवाड्यातील गोरगरीब गरजू रूग्णांना शासनाच्या विविध योजना व खाजगी, दानशूर संस्थांच्या मदतीने मागील तीन वर्षांपासून मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाचा मराठवाड्यातील असंख्य गोरगरीब रूग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच औरंगाबाद व जालना येथे अपंग व्यक्तींसाठी भव्य शिबीर आयोजित करून या शिबीरात सायकल, कृत्रिम पाय, कॅलीफर्स, कुबड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.