उप मुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्यासोबत औरंगाबाद येथे ‘संवाद’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात औरंगाबाद शहरातील काही निवडक शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, उद्योजक, साहित्यिक, वकील आदींना एकत्र आणून मराठवाड्याच्या विकासावर विचार मंथन केले. या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी मराठवाड्याच्या विविध समस्यांबाबत दादांशी थेट संवाद साधला.