उच्च माध्यमिक शिक्षण

दहावी नंतर पदवी व त्यानंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी हे शिक्षण गरजेचे आहे. साधारणतः कला, वाणिज्य व विज्ञान ही उच्च माध्यमिक शिक्षणाची मुख्य अंगे आहेत. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थांना विविध क्षेत्रातील उच्च शिक्षणाची दालने उघडी होतात.

कला शाखा निवडणार्‍या विद्यार्थ्यास पुढे परदेशी भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास, सामाजिक शास्त्र, पर्यटन, कायदा, व्यवस्थापन, जाहिरात प्रकाशन व इतर अनेक क्षेत्रामध्ये नोकरी व व्यवसायाच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत.

वाणिज्य शाखा निवडणार्‍या विद्यार्थास पुढे वाणिज्य, बँकिंग, कायदा, विमा, कंपनी सेक्रेटरी, लेखा परीक्षण, अर्थ व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील दालने उघडी होतात.

विज्ञान शाखा निवडणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी व कृषी तंत्रज्ञान, औषधीनिर्माण शास्त्र, वास्तुशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, नॅनो टेक्नॉलॉजी, ध्वनिशास्त्र, जेनेटिक सायन्स, अंतरिक्ष विज्ञान, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरण, जनुकशास्त्र, ओशनोग्राफी, मत्स्योत्पादन, दुग्ध व दुग्धोत्पादन शास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, कायदा, व्यवस्थापन या व अशा अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात.

कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधून पदवीप्राप्त विद्यार्थांना पुढे शासकीय सेवा, प्रशासकीय सेवा, औद्योगिक प्रतिष्ठानातील सेवा, संगणक क्षेत्र व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

अधिक माहितीसाठी Maharashtra State HSC Board, List of all Junior colleges in Aurangabad