आदरणीय शरद पवार साहेबांनी 23 जानेवारी 2020 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे उच्च शिक्षण खात्यातील प्रश्नांसंदर्भात बैठक बोलावली होती. उच्च शिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्यासह मी देखील या बैठकीस उपस्थित होतो. सदरील बैठकीत प्राचार्य, बिगर नेट/सेट धारकसह प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांबरोबरच विद्यापीठ कायदा, रूसाचा निधी वितरण, ग्रंथालयांची दर्जा वाढ व अनुदान वाढ, संवर्गनिहाय पद भरती आदी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, उच्च शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. वरील प्रश्‍न तातडीने मार्गी लावावेत अशा सूचना आदरणीय शरद पवार साहेबांनी संबंधितांना केल्या.