महानिर्मिती, महापारेषण व महावितरण मधील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात यावे अशी मागणी 21 ऑगस्ट 2019 रोजी तत्कालीन ऊर्जामंत्र्यांकडे केली होती. सदरील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ 1 एप्रिल 2018 पासून प्रलंबित होती. राज्यात जेंव्हा जेंव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेंव्हा हे अभियंते, अधिकारी व तांत्रिक कर्मचारी तन, मन धनाने धावून आलेले असल्याचे मी ऊर्जा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर शासनाने सदरील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली व प्रश्न सुटला.